६ ट्वेंटी-२०, ३ वन डे , २ कसोटी! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं जम्बो वेळापत्रक; इंग्लंड, ऑसींना भिडणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) गुरुवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:37 PM2023-10-27T20:37:39+5:302023-10-27T20:38:00+5:30

whatsapp join usJoin us
Team India (Senior Women) to host England and Australia in action-packed home season, check full schedule  | ६ ट्वेंटी-२०, ३ वन डे , २ कसोटी! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं जम्बो वेळापत्रक; इंग्लंड, ऑसींना भिडणार 

६ ट्वेंटी-२०, ३ वन डे , २ कसोटी! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं जम्बो वेळापत्रक; इंग्लंड, ऑसींना भिडणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) गुरुवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले.  या अॅक्शन-पॅक होम सीझनमध्ये डिसेंबरमध्ये दोन कसोटी, सहा ट्वेंटी-२० आणि तीन वन डे सामन्यांचा समावेश असेल. वानखेडे स्टेडियमवर ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका भारत अ आणि  इंग्लंड अ यांच्यात खेळवली जाणार आहे.  


इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळल्या जाणार्‍या ३ T20 सामन्यांच्या मालिकेतून भारताच्या आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाची सुरुवात होईल. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर १४ ते १७ डिसेंबर दरम्यान ४ दिवसीय कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौर्‍याची सांगता होईल.  त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची कसोटी सामन्याने सुरुवात होईल. त्यानंतर ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील.

Image

Image


 

Web Title: Team India (Senior Women) to host England and Australia in action-packed home season, check full schedule 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.