Join us  

६ ट्वेंटी-२०, ३ वन डे , २ कसोटी! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं जम्बो वेळापत्रक; इंग्लंड, ऑसींना भिडणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) गुरुवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 8:37 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) गुरुवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले.  या अॅक्शन-पॅक होम सीझनमध्ये डिसेंबरमध्ये दोन कसोटी, सहा ट्वेंटी-२० आणि तीन वन डे सामन्यांचा समावेश असेल. वानखेडे स्टेडियमवर ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका भारत अ आणि  इंग्लंड अ यांच्यात खेळवली जाणार आहे.  

इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळल्या जाणार्‍या ३ T20 सामन्यांच्या मालिकेतून भारताच्या आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाची सुरुवात होईल. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर १४ ते १७ डिसेंबर दरम्यान ४ दिवसीय कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौर्‍याची सांगता होईल.  त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची कसोटी सामन्याने सुरुवात होईल. त्यानंतर ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील.

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया