"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केलं जात आहे. 

By मोरेश्वर येरम | Published: January 19, 2021 02:35 PM2021-01-19T14:35:45+5:302021-01-19T14:57:01+5:30

whatsapp join usJoin us
team india series win against australia 2021 along with pm modi and other leaders praises team india | "दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केलं जात आहे. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. "ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाची उल्लेखनीय उर्जा आणि पॅशन दिसून आले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या दृढ निश्चय, धैय आणि निर्धाराचं खूप कौतुक आहे. संघाचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा", असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. 

भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय- डॉ. रघुनाथ माशेलकर
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही भारतीय संघाच्या विजयाचं कौतुक केलं आहे. "जबरदस्त विजय. मी पृथ्वीवर आतापर्यंत २,८४,७८८ दिवस जगलोय, पण आजचा दिवस आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे. जगातील सर्वात भेदक गोलंदाजी विरोधात खेळताना अवघ्या ३६ धावसंख्येवर ऑल ऑऊट होणं आणि मालिकेच्या अखेरीस सर्वोत्तम विजय प्राप्त करणं. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे", असं जबरदस्त ट्विट माशेलकर यांनी केलं आहे. 

रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाचं अभिनंदन- शरद पवार
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भारतीय संघाच्या विजयाचं कौतुक केलं आहे. पवार यांनी यावेळी मराठमोळ्या रहाणेचं विशेष कौतुक केलंय. "गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला", असं ट्विट पवार यांनी केलं आहे. 

 

Web Title: team india series win against australia 2021 along with pm modi and other leaders praises team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.