कोलंबो - मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता.
मार्चमध्ये श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा सुरू झाली आहे. बीसीसीआयने लिहिले की, श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, परंतु अद्याप तो पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून लंकेविरुद्ध सुपर फोर सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही.
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर १७ सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत तो फिट असेल का? वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियालाही धक्का बसू शकतो. नेपाळविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान डायव्हिंग करताना श्रेयसला दुखापत झाली होती.
श्रेयस अय्यरने बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्याने ९ चेंडूत दोन चौकारांसह १४ धावांची खेळी केली. पाकविरुद्ध सुपर फोर सामना मात्र तो खेळू शकला नव्हता.