Join us  

कुलदीपनं दिला शेन वॉर्नच्या आठणींना उजाळा; फोटो शेअर करत पुन्हा झाला भावूक

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव सध्या ऑस्ट्रेलियात आहे. मोठ्या सुट्टीच्या कालावधीत परदेशात भटकंतीला गेलेल्या कुलदीपनं दिवंगत आणि दिग्गज ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:26 PM

Open in App

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव सध्या ऑस्ट्रेलियात आहे. मोठ्या सुट्टीच्या कालावधीत परदेशात भटकंतीला गेलेल्या कुलदीपनं दिवंगत आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला. शेन वॉर्नसंदर्भातील खास नातं असल्याची गोष्ट सांगत भारतीय क्रिकेटपटूनं आपल्या मनातील भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या आहेत.   

कुलदीपनं दिली MCG ला भेट,  शेन वॉर्नच्या आठवणीत शेअर केली खास पोस्ट 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कुलदीप यादवनं मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला भेट दिली. या मैदानाच्या बाहेरील बाजूस शेन वॉर्नच्या स्मरणार्थ त्याच्या बॉलिंग शैलीतील एक मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. कुलदीपनं या ठिकाणी काही फोटो क्लिक करुन ते चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यावेळी शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त समजले त्यावेळी कुटुंबातील सदस्य गमावल्याची भावना मनात निर्माण झाली होती. आजही त्याच्या आठवणीत भावूक होतो, असे कुलदीप यादवनं म्हटले आहे. याआधीही कुलदीप यादवनं शेन वॉर्नसोबत खास बॉन्डिंगची गोष्ट शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.   

फॅमिली ट्रिपसाठी ऑस्ट्रेलियाला गेलाय कुलदीप

कुलदीप यादव आपल्या फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियात ट्रिपसाठी गेला आहे. यादरम्यान त्याने एमसीजी ग्राउंडला भेट दिली. स्टेडियम बाहेरील वॉर्नच्या पुतळ्यासोबत त्याने काही खास फोटो काढले. वॉर्नच्या आठवणीला उजाळा देताना कुलदीप म्हणाला की, "शेन वॉर्न माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व होता. त्याच्यासोबत माझं खास नातंही होतं. ज्या ज्या वेळी त्याच्याबद्दल मनात विचार येतो त्या त्या वेळी मन भावूक होते. मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना मनात कायमची घर करून आहे." ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टार शेन वॉर्न याचे 2022 मध्ये थायलंडमध्ये निधन झाले होते. ५२ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला होता.

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची उत्सुकता

भारतीय फिरकीपटूनं यावेळी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उत्सुक असल्याचे गोष्टही बोलून दाखवली. बॉर्डर गावसकर ट्रॉफीची आतुरतेनं वाट बघत आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. इथं भारतीय चाहत्यांकडून जे प्रोत्साहन मिळते, तेच चित्र यावेळीही पाहायला मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. सातत्याने टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या  चाहत्यांचे आभार मानायलाही तो विसरला नाही. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या मुख्यालयाला भेट दिली. एवढेच नाही तर सीईओ निक हॉकले यांच्याशी ऑनलाई चर्चाही केली.  

टॅग्स :ऑफ द फिल्डकुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाशेन वॉर्न