Join us  

मोठी बातमी! वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; अक्षरची एन्ट्री तर सॅमसन-चहलला डच्चू

Team India Squad for World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 1:36 PM

Open in App

World Cup 2023 । नवी दिल्ली : पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान यजमान भारतासमोर असेल. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी बहुचर्चित स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून संघात किरकोळ बदल करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. 

भारतीय संघात अक्षर पटेलची एन्ट्री झाली असून युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना वगळण्यात आले आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या लोकेश राहुल आणि श्रेयस यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे.

वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसीरोहित शर्माअजित आगरकर
Open in App