Team India squad for ICC Women T20 World Cup 2023: भारतीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आणि आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2023 साठी भारताच्या संघाची घोषणा केली. ICC महिला T20 विश्वचषक 2023ची सुरूवात १० फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. टीम इंडिया 12 फेब्रुवारीला केप टाऊनमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या स्पर्धेचा पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप 2 असून त्यांच्यासोबत इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड हे संघदेखील आहेत.
टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर टप्प्याच्या शेवटी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी खेळतील. त्यातूनच २६ फेब्रुवारी २०२३ रोजी केपटाऊनला अंतिम सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघाची जबाबदारी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर स्मृती मानधनाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संघात यष्टीरक्षक म्हणून यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या दोघींना संधी मिळाली आहे. तानिया भाटियाला संघात स्थान देण्यात आलेले नाही. राखीव खेळाडूंमध्ये सभिनेनी मेघना, स्नेह राणा आणि मेघना सिंग यांना घेण्यात आले आहे. तर हार्दिक पांड्याशी तुलना केली जाणाऱ्या पूजा वस्त्राकार हिला मात्र फिटनेसच्या कारणास्तव अद्याप संघात समाविष्ट केलेले नाही.
ICC महिला T20 विश्वचषक 2023 साठी भारताचा संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैदिक राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे
राखीव: सभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग
वर्ल्डकपच्या साखळी फेरीतील भारताचे सामने
- १२ फेब्रुवारी - भारत वि पाकिस्तान - केप टाऊन
- १५ फेब्रुवारी - भारत वि विंडिज - केप टाऊन
- १८ फेब्रुवारी - भारत वि इंग्लंड - पोर्ट एलिजाबेथ
- २० फेब्रुवारी - भारत वि आयर्लंड - पोर्ट एलिजाबेथ
२६ फेब्रुवारीला वर्ल्ड कप फायनल होणार आहे. त्याआधी भारत-आफ्रिका-विंडिज यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. १९ ते ३० जानेवारी दरम्यान साखळी सामने होणार असून फायनल २ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.