नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील १५ सदस्यीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार का हे पाहण्याजोगे असेल. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताचा सलामीलीवीर शिखर धवनला आशिया चषकापाठोपाठ विश्वचषकाच्या संघातून देखील वगळण्यात आलं आहे. अशातच गब्बरनं तमाम भारतीयांच्या मनातील इच्छा बोलून दाखवताना टीम इंडियाला मोठ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयच्या पोस्टवर व्यक्त होताना शिखर धवननं म्हटलं, "विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या माझ्या सहकारी आणि मित्रांचे अभिनंदन. १.५ अब्ज लोकांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याने तुम्ही आमच्या आशा आणि स्वप्ने पूर्ण करता. तुम्ही विश्वचषकाची ट्रॉफी घरी आणून आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी."
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू