IND vs ENG : पाचव्या कसोटीतून भारताच्या प्रमुख खेळाडूची माघार, अष्टपैलू खेळाडूलाही केलं रिलीज

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:29 PM2024-02-29T14:29:15+5:302024-02-29T14:33:20+5:30

whatsapp join usJoin us
Team India Squad Updates: 5th Test vs England- KL Rahul has been ruled out of the fifth and final Test in Dharamsala | IND vs ENG : पाचव्या कसोटीतून भारताच्या प्रमुख खेळाडूची माघार, अष्टपैलू खेळाडूलाही केलं रिलीज

IND vs ENG : पाचव्या कसोटीतून भारताच्या प्रमुख खेळाडूची माघार, अष्टपैलू खेळाडूलाही केलं रिलीज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Squad Updates: 5th Test vs England- ( Marathi News ) : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. हैदराबाद कसोटी गमवाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील ३ कसोटी जिंकल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी कसोटी धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, त्याआधी लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होता आणि त्याच्या माघारीचे वृत्त बीसीसीआयने दिले आहे. 


लोकेश राहुल याचा शेवटच्या कसोटीत सहभाग फिटनेसवर अवलंबून होता. त्याला धर्मशाला येथील पाचव्या आणि अंतिम कसोटीतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्याच्या समस्येच्या पुढील व्यवस्थापनासाठी लंडनमधील तज्ञांशी समन्वय साधत आहे. दरम्यान, रांची येथील चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर पडलेला जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीसाठी  संघात दाखल झाला आहे.

अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांला रिलीज केले गेले आहे. तो २ मार्चपासून मुंबई विरुद्धच्या रणजी करंडक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तामिळनाडू संघाकडून खेळणार आहे. गरज भासल्यास, पाचव्या कसोटीसाठी देशांतर्गत सामना संपल्यानंतर तो भारतीय संघात सामील होईल. मोहम्मद शमीच्या उजव्या टाचांच्या समस्येवर २६ फेब्रुवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो बरा होत आहे आणि लवकरच त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये जाणार आहे.


पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ:  रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप. ( India’s updated squad for the 5th Test: Rohit Sharma (C), Jasprit Bumrah (VC), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.)
 

 

Web Title: Team India Squad Updates: 5th Test vs England- KL Rahul has been ruled out of the fifth and final Test in Dharamsala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.