IPL 2022 : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आयपीएल २०२२ साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction) रिलीज करण्यात आलं. पांड्यानं २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू केला होता. त्यानंतर अनेकदा त्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला सामने जिंकवले होते. आयपीएल २०२१ मध्ये हार्दिक पांड्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तसंच दुखापतीमुळे त्याला गोलंदाजीही करता आली नाही.
१२ सामन्यांमध्ये हार्दिकला केवळ १२७ धावाच करता आल्या होत्या. परंतु आता मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यानंतर हार्दिकनं एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "मी या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवेन. माझे मित्र, सहकारी, चाहते यांचा मी कायम आभारी राहिन. मी केवळ एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही माझा विकास झाला. मी अनेक स्वप्न उराशी बाळगून संघात आलो होतो. आम्ही एकत्र जिंकलो, एकत्र हरलो, एकत्र लढलो. या टीमसोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्या हृदयात आहेत. चांगल्या गोष्टी संपल्या पाहिजेत परंतु मुंबई इंडियन्ससाठी माझ्या हृदयात कायमच एक विशेष जागा राहिल," असं पांड्या म्हणाला.
हार्दिक पांड्यासह त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्यालादेखील फ्रेन्चायझीनं रिलिज केलं. मुंबई इंडियन्सनं चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांच्या नावांचा समावेश आहे.
Web Title: team india star all rounder hardik pandya shares emotional video after mumbai indians not retain him ahed ipl 2022 auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.