Rishabh Pant paid a college boy fees : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. सामन्यादरम्यान स्टम्प माईकमध्ये कैद झालेला पंत आवाज चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. सध्या सुट्टीचा आनंद घेत असलेला रिषभ लवकरच दुलीप ट्रॉफीत झळकणार आहे. पंत क्रिकेटपासून दूर असला तरी नेहमी चर्चेत असतो. आता तो त्याच्या दिलदारपणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. एका चाहत्याने त्याच्याकडे आर्थिक मदत मागितली असता पंतने भलीमोठी रक्कम देऊन सर्वांची मनं जिंकली. एका विद्यार्थ्याने Ketto च्या माध्यमातून आपल्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले होते. कार्तिकेय मौर्या या विद्यार्थ्याला ९० हजारांची गरज होती. मग त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मदत मागितली आणि त्यात रिषभ पंतला टॅग केले.
संबंधित विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट करताच पंतने त्याला रिप्लाय दिला. खरे तर रिषभने कार्तिकेयला ९०,००० हजार रुपयांची मदत केली. एका एक्स हँडलवरुन कार्तिकेयने लिहिले की, रिषभ पंत सर मी एक विद्यार्थी आहे आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यासाठी मला आर्थिक मदत हवीय. तुमच्या मदतीमुळे माझे जीवन बदलू शकते. प्लीज माझी मदत करा किंवा माझ्यासाठी आवाज उठवा. मग पंतने विद्यार्थ्याची फी भरली आणि म्हटले की, तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा... देवाकडे नेहमीच एक चांगली योजना असते.
दरम्यान, रिषभ पंतचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. २०२२ च्या अखेरीस अपघात झाल्यानंतर पंत जवळपास दीड वर्ष क्रिकेटपासून दूर होता. मग त्याने आयपीएल २०२४ मधून जोरदार पुनरागमन केले. याशिवाय त्याला ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चे तिकीटही मिळाले. भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला पंत आगामी काळात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार का हे पाहण्याजोगे असेल.
Web Title: Team India star player Rishabh Pant paid a college boy fees of 90,000
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.