Team India T20 Squad Announced for West Indies Tour : २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी आज भारताचा संघ जाहीर झाला. या मालिकेतही विराट कोहली विश्रांती देण्यात आल्याने आता तो आणखी एका मालिकेला मुकणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन डेत दुखापतीमुळे खेळू न शकलेला विराट आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावरही संघासोबत जाणार नाही. BCCI ने आज विंडीज दौऱ्यावरील पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला, त्यातून विराट कोहलीला वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विराटला खास कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याला ट्वेंटी-२० संघातून वगळ्याची मागणी जोर धरली आणि सतत विश्रांती घेत असल्यामुळेही अनेकांची त्याच्यावर नाराजी होती. आज BCCI ने त्याला पुन्हा एकदा विश्रांती दिली आहे. त्याच्यासह जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हाही या मालिकेत खेळणार नाही.
BCCI ने या दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला होता. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वन डे मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. त्या संघातून रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर आता या दौऱ्यावरील टी२० संघ जाहीर करण्यात आला. पाहूया टी२० संघ-
भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
*के एल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेस टेस्टनंतर, असेही BCCI ने सांगितले आहे.
भारताचा वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
वेस्टइंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
वन डे मालिका-२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
ट्वेंटी-२० मालिका- २९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)