Team India New T20 Coach: T20 विश्वचषकानंतर सीनिअर टीम इंडिया पुन्हा अॅक्शनमध्ये परतला. संघातील सीनिअर खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविडदेखील या मालिकेपासून संघासोबत परतले आहेत. परंतु पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय लवकरच संघात मोठे बदल करणार आहे.
T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) T20 साठी वेगळ्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला T20 संघातून वगळले जाऊ शकते. बोर्डाच्या एका सूत्राने मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय T20 संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीमध्ये घोषित केला जाऊ शकतो. त्याचबरोबर टीम इंडियाला जानेवारीतच श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला पुष्टी केली आहे की, बोर्ड T20 संघासाठी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्यात इच्छुक आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली माहिती
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, 'आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड किंवा कोणाच्याही क्षमतेबद्दल आम्हाला संशय नाही. T20 एक वेगळा खेळ आहे, त्यामुळेच T20 साठी वेगळा कोचिंग सेटअप असेल.' दरम्यान, राहुल द्रविडच्याऐवजी कोण असेल, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.
Web Title: Team India: T20 team to get new 'Coach', BCCI in action mode after teams poor performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.