Join us  

टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:03 PM

Open in App

बीसीसीआयने भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 

भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर आपल्या मोहिमेची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करणार आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. यानंतर २० जुलैपासून दुसरा कसोटी सामना सुरू होईल. कसोटीनंतर दोन्ही संघ ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये भिडतील. वन डे मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना २९ तारखेला आणि तिसरा सामना १ ऑगस्टला होणार आहे.

भारतीय संघ कसोटी आणि वनडेनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. टी-२० मालिकेतील पहिला सामना ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील दुसरा सामना ६ ऑगस्टला, तिसरा सामना ८ ऑगस्टला होणार आहे. मालिकेतील चौथा टी-20 सामना १२ ऑगस्टला तर शेवटचा सामना १३ ऑगस्टला होणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघेही फ्लॉप झाले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि पुजारा यांसारख्या फलंदाजांनी खूप निराश केले, तर गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि सिराजचा वेग आणि स्विंग टीम इंडियासाठी काम करू शकला नाही. भारतीय संघाचा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचून दुसऱ्यांदा पराभव झाला. याआधी २०२१ मध्ये न्यूझीलंड संघाने भारताचे स्वप्न भंगले होते. डब्ल्यूटीसीच्या फायनलनंतर भारत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली
Open in App