Join us  

वर्ल्ड कपमध्ये सुट्टी मिळताच राहुल द्रविड ट्रेंकिंगला; सपोर्ट स्टाफसोबत लुटला निसर्गाचा आनंद

BCCI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:14 PM

Open in App

Rahul Dravid Triund Trekking: क्रिकेटचा वन डे विश्वचषक (ODI World Cup 2023) सध्या भारतात खेळला जात आहे. टीम इंडियाने स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाच सामनेही जिंकले आहेत. रविवारी, २९ ऑक्टोबरला लखनौमध्ये इंग्लंडचा सामना करायचा आहे. याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात फिरण्याचा आणि निसर्गाचा आनंद लुटला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून बुधवारी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड निसर्गाच्या सानिध्यात रमताना दिसले.

राहुल द्रविड शिवाय सपोर्ट स्टाफचे इतर सदस्यही या संघासोबत आहेत. यामध्ये सर्वजण ट्रूंडमध्ये ट्रेक करताना दिसले. विशेष म्हणजे पहाटेच ट्रेकिंग करत राहुल द्रविड ट्रूंडला पोहोचले. सर्वांनी तिथे बराच वेळ घालवला आणि खूप मज्जा केली. पाहा व्हिडीओ-

द्रविड या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसला, "एकदा तुम्ही ट्रेक करून वर चढलात की तुम्हाला आनंद मिळतो. वरून दिसणारे सुंदर दृश्य पाहून तुमचा सारा ताण संपतो. मी सपोर्ट स्टाफसोबत आलो, खूप छान वाटलं. विश्वचषकादरम्यान खेळाडूंना येणे थोडे धोक्याचे आहे. मला आशा आहे की ते सुटीच्या दिवशी किंवा दौऱ्यावर नसतील तेव्हा नक्की येतील. काही ठिकाणे निसर्गाच्या अगदी जवळ आहेत, सुंदर आहेत, मला आशा आहे की ती अशीच राहतील. हे आपण भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. मी माझ्या मुलांकडूनही अशीच अपेक्षा करेन," असे तो म्हणाला.

टॅग्स :राहुल द्रविडवन डे वर्ल्ड कप