सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीला आजपासून सिडनीत सुरुवात झाली आहे. या सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघ दंडावर काळ्या रिबीन बांधून मैदानात उतरला. यासंदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करून माहिती दिली आहे. रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मैदानात काळी पट्टी बांधून उतरले आहेत. असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली
टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली
सिडनी कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 10:11 AM
ठळक मुद्देसिडनी कसोटी सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिलीरमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मैदानात काळी पट्टी बांधून उतरले अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी निधन झाले होते