टीम इंडियाची आगामी वन डे मालिका रद्द! 1 महिना खेळणार नाही कोणताही सामना

WTC Final चा सामना झाल्यावर भारतीय संघ महिनाभर विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:38 PM2023-06-06T17:38:39+5:302023-06-06T17:39:16+5:30

whatsapp join usJoin us
Team India upcoming IND vs AFG ODI series cancelled Indians Will not play any match for 1 month | टीम इंडियाची आगामी वन डे मालिका रद्द! 1 महिना खेळणार नाही कोणताही सामना

टीम इंडियाची आगामी वन डे मालिका रद्द! 1 महिना खेळणार नाही कोणताही सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India: टीम इंडियाला उद्यापासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल 2023) चा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाला एकदिवसीय मालिका खेळायची होती. पण एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर पुढील एक महिना कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही असे सांगितले जात आहे.

टीम इंडियाची ही एकदिवसीय मालिका रद्द!

टीम इंडियाला WTC फायनलनंतर जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी एक मालिका खेळली जाणार होती, ती आता पुढे नेण्यात आली आहे. भारतीय संघ जूनमध्येच अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मालिका आता पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका आयोजित करण्यात अडचणी निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर महिनाभर रजेवर असणार आहेत.

WTC फायनल नंतर थेट वेस्ट इंडिज दौरा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल 2023)चा अंतिम सामना खेळल्यानंतर, भारतीय संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत कॅरेबियन भूमीवर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये आशिया कप आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रकही निश्चित ठरलेले नाही.

IND vs AFG मालिका कधी खेळवली जाईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार होती, परंतु आता ही मालिका कधी खेळली जाईल हे स्पष्ट नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मालिका आता सप्टेंबरमध्येही खेळली जाऊ शकते. भारतीय संघाचा पुढील दौरा जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा असून त्यानंतर टीम इंडिया आयर्लंडलाही जाणार आहे.

Web Title: Team India upcoming IND vs AFG ODI series cancelled Indians Will not play any match for 1 month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.