Join us  

वानखेडेवर भारतीय संघाचं 'ग्रँड सेलिब्रेशन', कोहली-रोहितचं 'इमोशनल स्पीच'! जाणून घ्या, कोण काय बोललं?

दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. तर, दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:44 AM

Open in App

बार्बाडोसाच्या मैदानावर २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. सायंकाळच्या सुमारास मुंबईत आल्यानंतर, संपूर्ण संघ एका बसमध्ये बसून मरीन ड्राइव्हला पोहोचला. येथे विश्व विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी हजारो लोक आधीपासूनच उपस्थित होते. येथे भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर, नरिमन पॉइंटवरून सर्व भारतीय खेळाडूंनी खुल्या बसमधून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. तर, दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेक सुपूर्द केल्यानंतर झाला.

कोण काय बोललं? -रोहित शर्मा -"ही ट्रॉफी केवळ आमच्यासाठीच नसून, सर्व देशवासियांसाठी आहे. सकाळी पंतप्रधान मोदींना भेटून मोठा सन्मान झाल्यासारखे वाटले. ते खेळांबद्दल प्रचंड उत्साही आहेत. जेव्हा डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या बॉलवर जोरदार फटका मारला, तेव्हा हवेमुळे तो षटकार जाईल, असे वाटले होते. मात्र हे सर्व नशिबात लिहिलेले होते. सूर्यकुमार यादवचा तो झेल अविश्वसनीय होता. मला या संपूर्ण टीमचा अभिमान आहे."

विराट कोहली-मी आणि रोहित शर्मा दीर्घ काळापासून हे साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे स्वप्न नेहमीच वर्ल्ड कप जिकण्याचे होते. आम्ही जवळपास 15 वर्षांपासून सोबत खेळत आहोत आणि मी कदाचित पहिल्यांदाच रोहितला एवढे इमोशनल होताना बघत आहे. तो रडत होता, मी रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. हा दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाजही वारंवार जनामाला येत नाहीत. तो जगातील आठवे आश्चर्य आहे."

राहुल द्रविड -लोकांचे हे प्रेम माझ्या नेहमीच स्मरणात राहील. आज रस्त्यांवर पाहिलेले दृष्य मी कधीही विसरू शकणार नाही.

जसप्रीत बुमराह-"मी आज जे काही बघितले, तसे यापूर्वी कधीही बघितले नव्हते. सध्या निवृत्ती घेण्याची माझी कसलीही इच्छा नाही. माझ्या निवृत्तीला आणखी बरेच दिवस आहेत. ही केवळ सुरुवात आहे."

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माविराट कोहलीजसप्रित बुमराह