"WC च्या रनसंग्रामात पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त दबाव कारण...", भज्जीनं सांगितलं गणित

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 05:30 PM2023-06-27T17:30:34+5:302023-06-27T17:31:11+5:30

whatsapp join usJoin us
Team India will be under more pressure than Pakistan in ICC Men's Cricket World Cup 2023, says Harbhajan Singh   | "WC च्या रनसंग्रामात पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त दबाव कारण...", भज्जीनं सांगितलं गणित

"WC च्या रनसंग्रामात पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त दबाव कारण...", भज्जीनं सांगितलं गणित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : वन डे विश्वचषकात पाकिस्तानपेक्षा भारतीय संघावर अधिक दबाव असेल, असे भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने सांगितले. आगामी वन डे विश्वचषक भारतात होत असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. "हा सामना भारतीय भूमीवर होणार असल्याने भारतीय समर्थकांच्या मोठ्या अपेक्षा असतील अन् त्यामुळेच पाकिस्तानपेक्षा भारतीय संघावर दबाव जास्त असेल", असे भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने म्हटले आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याबद्दल बोलताना हरभजन म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच तणावाचा राहिला आहे. यावेळी पाकिस्तानी संघावर फारसा दबाव नसेल पण टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांच्यावर खूप दबाव असेल. साहजिकच हे दडपण हाताळणे, विजय खेचून आणणे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट असेल.

पाकिस्तानपेक्षा भारतावर अधिक दवाब - हरभजन सिंग
तसेच भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यापेक्षा कोणताच सामना मोठा नाही. मला आजही आठवतंय की, २०११ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना अंतिम सामन्यासारखा होता. तमाम भारतीय विजयाच्या आशेने आमच्याकडे पाहत होते. त्यामुळे आगामी सामन्यात देखील हेच होईल अन् भारतीय संघावर खूप दबाव असेल, असे हरभजन सिंगने आणखी सांगितले. 

दरम्यान, १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आज आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.

विश्वचषकातील भारताचे सामने - 

  1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
  2. भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
  3. भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
  4. भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
  5. भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
  6. भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
  7. भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
  8. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
  9. भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू 

Web Title: Team India will be under more pressure than Pakistan in ICC Men's Cricket World Cup 2023, says Harbhajan Singh  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.