-व्ही. व्ही. एस. लक्ष्मणमायदेशातील मालिकेची सुरुवात नेहमीच रोमांचक होते. कारण २१ महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघ मायदेशात खेळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडू नक्कीच उत्साहित असतील. विंडीजविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदची शानदार सुरुवात करणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ लय कायम राखण्यास प्रयत्नशील असेल.सर्वांची नजर आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीवर राहणार आहे. आघाडीच्या फळीला विंडीज दौऱ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मयांक अग्रवालने टप्प्याटप्प्यात चांगली कामगिरी केली असली, तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. आगामी तीन आठवडे यावर विशेष जोर दिला जाणार आहे, पण सर्वांची नजर कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करणाºया रोहित शर्माच्या कामगिरीवर केंद्रित झालेली असेल. रोहित अनुभवी व परिपक्व खेळाडू असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. कसोटी क्रिकेटमधील यशावरुन खेळाडूचा दर्जा ठरत असतो. रोहितने त्यासाठी निश्चितच योजना आखली असेल. त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे नैसर्गिक शैली कायम राखणे. सलामीवीर म्हणून मायदेशात खेळण्याचे महत्त्व त्याने ओळखलेले असेल. त्याचसोबत चेतेश्वर पुजाराला धावा फटकावण्याची पद्धत शोधावी लागणार अहे. पाच दिवसीय क्रिकेटमध्ये चेतेश्वर व कोहली भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत.तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतर रिद्धिमान साहाला पंतच्या तुलनेत पसंती दर्शविण्यात आली अहे. भारतीय खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षकाची निवड योग्यतेच्या आधारावर व्हायला हवी. बुमराहची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय गोलंदाजी कुणा एका विशेष खेळाडूवर अवलंबून नाही. इशांत शर्मा व शमी चांगला पर्याय ठरू शकतात. अश्विन पुनरागमनासाठी उत्सुक असून जडेजाच्या साथीने त्याची जोडी पुन्हा एकदा आपली छाप सोडेल, अशी आशा आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मायदेशात पुन्हा यजमान संघ गाजवणार वर्चस्व
मायदेशात पुन्हा यजमान संघ गाजवणार वर्चस्व
मायदेशातील मालिकेची सुरुवात नेहमीच रोमांचक होते. कारण २१ महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघ मायदेशात खेळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडू नक्कीच उत्साहित असतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:47 AM