IND vs PAK Champions Trophy 2025 : ट्वेंटी-२० विश्वचषकात पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानला वरचढ ठरला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शेजाऱ्यांना घाम फुटला. टीम इंडियाने सहा धावांनी पाकिस्तानचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. भारताविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना आता इतरही काही संघावर अवलंबून राहावे लागेल. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आणि आशिया चषकात भिडत असतात. पुढील वर्षी पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया शेजाऱ्यांच्या देशात जाणार का हे पाहण्याजोगे असेल. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संभावित वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल असे सुचवले आहे. 'क्रिकबज'ने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबीने आयसीसीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संभाव्य वेळापत्रक सोपवले आहे. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हा सामना लाहोर येथे होईल. ही लढत साखळी फेरीतील १५ सामन्यांमध्ये सर्वात शेवटी असेल. मात्र, अद्याप सामन्याची तारीख समोर आली नाही. तसेच कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होतील असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.
१९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान थरार
अलीकडेच क्रिकबजने एका रिपोर्टमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संभावित वेळापत्रक जाहीर केले होते. यामध्ये १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचे नमूद होते. मात्र, अद्याप तरी आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेले तणावाचे वातावरण... राजकीय घडामोडी हे पाहता भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाईल की नाही याबद्दल शंका आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आशिया चषकाप्रमाणे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल.
Web Title: Team India will go to Pakistan Pakistan Cricket Board handed over the schedule to the ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.