Join us  

Team Indiaची लागणार आता कसोटी, न्यूझीलंडच्या संघात दाखल झाला 'जाइंट' किलर

भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आली आहे. पण आता न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिका गमावल्यावर एकदिवसीय क्रिकेट मालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 6:34 PM

Open in App

ऑकलंड : न्यूझीलंडमध्येभारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवत इतिहास रचला आहे. कारण भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आली आहे. पण आता न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिका गमावल्यावर एकदिवसीय क्रिकेट मालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने एका 'जाइंट' किलरला संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या या 'जाइंट' किलरपुढे भारताच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे, असे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा निकाल बुधवारी लागला. पाहुण्या टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता उर्वरीत दोन सामने ही केवळ औपचारिकता राहिली आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून यजमान वन डे मालिकेत विजय मिळवण्यासाठी नक्की प्रयत्नशील असतील.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला पाच फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना ११ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची गुरुवारी घोषणा केली.

न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात काही बदल केले आहेत. यावेळी न्यूझीलंडच्या संघात स्कॉट कुग्गेलइजन आणि हॅमिश बेन्नेट यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने आता सहा फूट सहा इंच उंचीच्या गोलंदाजाला संधी देण्याचे ठरवले आहे. हा उंचपुरा गोलंदाज आहे कायले जेमिसन. 

हा 'जाइंट' किलर जेमिसन नेमका आहे तरी कोण...जेमिसनचा जन्म ऑकलंडमध्ये झालेला आहे. स्थानिक सामन्यांमध्ये जेमिसनने दमदार कामगिरी केली आहे. जेमिसनने आतापर्यंत २५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, या २५ सामन्यांमध्ये जेमिसनने ७२ बळी मिळवले आहेत. आतापर्यंत एका डावात आठ विकेट्स घेण्याचा पराक्रमही जेमिसनने केलेला आहे. त्यामुळे भारताला धक्का देण्यासाठी आता न्यूझीलंडने जेमिसनला पाचारण केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.

दोन्ही संघ

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हॅमिश बेन्नेट, टॉम ब्लंडल, कॉलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्तील, कायले जेमिसन, स्कॉट कुग्गेलेइजन, टॉम लॅथम, जिमी निशॅम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोढी ( पहिल्या सामन्यासाठी), टीम साऊदी, रॉस टेलर. 

भारताचा वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतन्यूझीलंड