Team India Grand Welcome, T20 World Cup 2024: भारताने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकप जिंकला. या विजयानंतर गेले ३-४ दिवस भारताचा संघ वादळाच्या धोक्यामुळे बार्बाडोसमध्येच अडकून पडला होता. अखेर एअरइंडियाच्या खास विमानाने भारतीय क्रिकेट संघ ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दिवसभराचा कार्यक्रम काय असेल? याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे.
२९ जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या T20 कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याची टीम इंडिया आता थेट दिल्लीत दाखल होईल. भारतीय क्रिकेट संघाचे विमान सकाळी ६ वाजता दिल्लीत पोहोचेल. भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या देशात परतण्याची देशवासीय वाट पाहत आहेत. जाणून घेऊया कार्यक्रम-
टीम इंडियाचा ४ जुलैचा कार्यक्रम
- गुरुवारी सकाळी ६ वाजता टीम इंडियाने विमानाने दिल्लीत उतरेल.
- सकाळी ९.३० च्या सुमारास ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना होतील.
- त्यांची भेट घेतल्यानंतर संघ मुंबईला चार्टर्ड फ्लाइटने जाणार आहेत.
- मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम पर्यंत संघ वाहनाने जाईल.
- वानखेडेमध्ये १ किलोमीटर पर्यंत खुल्या बसमधून जल्लोष केला जाईल.
- वानखेडेवर एक छोटेखानी कार्यक्रम होईल.
- नंतर रोहितकडून विश्वचषकाची ट्रॉफी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे सोपवण्यात येईल.
- अखेर सायंकाळी कार्यक्रमाची सांगता होईल.
दरम्यान, भारतीय संघाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पाठवण्यात आले. त्याचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. AIC24WC (Air India Champions 24 World Cup) नावाचे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान तेथे गेले. भारतीय संघ, त्यांचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही अधिकारी आणि भारतीय प्रसारमाध्यमे यांना परत आणण्यासाठी हे विमान सज्ज आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जण तेथे अडकून पडले होते.
Web Title: Team India will receive grand welcome from people and bcci pm modi meeting greeting return journey t20 world cup 2024 on 4 July full schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.