भारताचा महिला संघही T20 World Cup जिंकणार? कर्णधार हरमनने रणशिंग फुंकले, म्हणाली...

Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced : ३ ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 08:03 PM2024-08-27T20:03:52+5:302024-08-27T20:04:43+5:30

whatsapp join usJoin us
Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced Skipper Harmanpreet Kaur reacts | भारताचा महिला संघही T20 World Cup जिंकणार? कर्णधार हरमनने रणशिंग फुंकले, म्हणाली...

भारताचा महिला संघही T20 World Cup जिंकणार? कर्णधार हरमनने रणशिंग फुंकले, म्हणाली...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मंगळवारी बीसीसीआयने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारताच्या महिला संघाची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने विश्वचषक जिंकला. तब्बल १७ वर्षांनी भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. आता भारताच्या महिला संघाकडूनही या इतिहासाची पुनरावृत्ती रचण्याची अपेक्षा साऱ्यांना आहे. याचाच दाखला देत भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एक सूचक विधान केले. पुरुष संघाप्रमाणे आम्ही देखील भारतीयांना जल्लोष करण्याची संधी देऊ असे तिने सांगितले.

BCCI ने जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सोमवारी ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

३ ऑक्टोबरपासून थरार

भारतीय कर्णधार हरमनप्रीतने सांगितले की, आम्हाला भारताच्या पुरुष क्रिकेट संघाकडून खूप प्रेरणा मिळते. त्यांनी यंदा ज्यापद्धतीने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला तो प्रवास अप्रतिम होता. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. त्यामुळे मला वाटते की, आम्हाला त्यांची कामगिरी पाहून पावले टाकण्याची गरज आहे. त्यांनी काही कठीण सामन्यांमध्ये विजय संपादन केला. भारताचा महिला संघ विश्वचषकासाठी सज्ज आहे. आमचा संपूर्ण संघ तमाम भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी देण्यासाठी खूप मेहनत करत आहे. 

भारताचा संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.

Web Title: Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced Skipper Harmanpreet Kaur reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.