Team India Women Squad for T20 World Cup 2024 Announced: दोन महिन्यांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने विश्वचषक जिंकला. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी२० विश्वचषक उंचावला. आता भारताच्या महिला संघाकडूनही या इतिहासाची पुनरावृत्ती रचण्याची अपेक्षा साऱ्यांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर BCCI ने महिला T20 वर्ल्ड कप 2024 साठी महिला संघाची घोषणा केली आहे. १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ही संघाची कर्णधार असणार आहे तर उपकर्णधारपद स्मृती मंधना हिच्याकडे असेल.
BCCI ने जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सोमवारी ICC T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला टी२० विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसी ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
टी२० विश्वचषक २०२५ साठी भारताचा १५ खेळाडूंचा संघ- हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव
Web Title: Team India Women Squad for T20 World Cup 2025 Announced by BCCI Harmanpreet Kaur Captain Smriti Mandhana vice captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.