Team India Cricketer Radha Yadav stuck in Gujrat Floods rescued by NDRF: मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. वडोदरा शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. या पुरात भारतीय महिला क्रिकेटर राधा यादवही अडकली होती. मात्र, आता एनडीआरएफच्या टीमने तिची या समस्येतून सुटका केली आहे. याची माहिती खुद्द राधाने सोशल मीडियावर दिली आहे. आपला जीव वाचवल्याबद्दल तिने एनडीआरएफ टीमचे आभारही मानले.
रस्त्यांवर पाणीच पाणी, वाहनेही बुडाली
राधा यादव ही आगामी महिला टी२० विश्वचषकात टीम इंडियाचा एक भाग आहे. आपल्या बचावाची माहिती देताना तिने आपल्या भागातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडीओत संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. वाहने पाण्यात बुडालेली दिसली. या व्हिडिओमध्ये अनेक लोक साचलेल्या पाण्यातून पळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तेवढ्यात एनडीआरएफची टीम पूरग्रस्ताना वाचवण्यासाठी येते. संपूर्ण परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचेही याच स्पष्ट दिसते.
टी२० संघात राधा यादवचा समावेश
महिला टी२० विश्वचषकाचे आयोजन बांगलादेशमध्ये होणार होते. मात्र त्यांच्या देशातील हिंसाचारामुळे खेळाडूंच्या सुरक्षेला धोका असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आयसीसीने स्पर्धा यूएईला हलवली आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच भारतीय संघ जाहीर केला. १५ सदस्यांच्या या संघात राधा यादवच्या नावाचाही समावेश आहे. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे.
Web Title: Team India Womens Cricketer Radha Yadav stuck in Gujrat Floods rescued by NDRF
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.