Team India WTC Final Scenario: ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 (WTC फायनल 2023) चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल क्रिकेट मैदान, लंडन येथे खेळवला जाईल. या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस (१२ जून) देखील ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडियाच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. टीम इंडियाने दिल्ली टेस्ट 6 विकेट्सने जिंकली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना फारशी चमक दाखवता आली नसली, तरी रविंद्र जाडेजाने दमदार कामगिरी केली.
WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळविल्याने भारताचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC पॉइंट टेबल) गुणतालिकेत ६४.०६ टक्के गुण आहेत, पण टीम इंडियाचा अंतिम सामन्यातील प्रवेश अद्याप निश्चित झालेला नाही. श्रीलंकेचा संघ अजूनही भारताला मागे टाकू शकतो. अंतिम फेरीची शर्यत आता तीन संघांमध्ये आहे. दिल्लीत भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका अंतिम शर्यतीतून बाहेर झाले आहे.
या संघांमध्ये फायनल होण्याची शक्यता
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 (WTC फायनल 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) यांच्यात होण्याची शक्यता आहे. या दोन संघांमधील अंतिम सामना होण्याची शक्यता 88.9% आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता 8.3% आहे. त्याच वेळी, भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना खेळण्याची शक्यता केवळ 2.8% आहे.
भारताला अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी आहे
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा WTC फायनलच्या जवळ पोहोचण्यास मदत झाली आहे. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांतून आणखी एक विजय आवश्यक आहे आणि 62.50% च्या किमान गुण हवे आहेत. तरच भारताचे अंतिम फेरीत श्रीलंकेपेक्षा जास्त गुण असतील.