Join us

आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!

आशिया चषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 20:53 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे असेल. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन. 

राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग. 

भारत या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होईल, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील. 

आशिया चषकातील भारताचे सामने -

  1. १९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान
  2. २१ जुलै - भारत विरूद्ध यूएई
  3. २३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ
टॅग्स :एशिया कप 2023भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध पाकिस्तानहरनमप्रीत कौर