Rohit Sharma And Rahul Dravid : ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. १ जून रोजी टीम इंडिया बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळेल. टीम इंडियाचे शिलेदार अमेरिकेतील फोटो शेअर करत आहेत. अशातच तेथील काही चाहत्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा मजेशीर व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात टिपला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड पावसात त्यांच्या वाहनाकडे जात आहेत.
पावसाची एन्ट्री आणि रोहित-द्रविडची उडालेली तारांबळ चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. न्यूयॉर्कमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. रोहित खिडकीतून बाहेरील कार चालकाला इशाऱ्याद्वारे काहीतरी सांगत असल्याचे दिसते. मग तो भरपावसात धावत गाडीच्या दिशेने रवाना झाला. त्याच्या पाठोपाठ राहुल द्रविड देखील गेले. टीम इंडिया आगामी स्पर्धेसाठी सज्ज असून तयारीला लागली आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ