भारतीय संघाचा नियमित कसोटी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. पर्थमध्ये एन्ट्री मारल्याचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हिटमॅनच्या कमबॅकमुळे टीम इंडियाच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला असला तरी त्याची एन्ट्री एका अर्थानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण
रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला मिळाली होती ओपनिंगची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात रंगला आहे. रोहित दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकला होता. आता त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं भारतीय डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. टीम मॅनेजमेंटनं ठेवलेला विश्वास केएल राहुलनं सार्थही ठरवला. पण आता रोहित शर्मा परतल्यामुळे त्याला पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते.
रोहितच्या एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलसाठी टेन्शन देणारी कशी?
या परिस्थितीत टीम इंडियासह लोकेश राहुलचं टेन्शन थोडे वाढणारी आहे. कारण लोकेश राहुल हा कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. पण मागील काही सामन्यात तो मध्य फळीसह लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना तो सातत्याने अपयशी ठरला आहे. रोहितच्या एन्ट्रीमुळे त्याच्या बॅटिंग ऑर्डरमधील बदल हा टीम इंडियासह लोकेश राहुलसाठी टेन्शन देणारा ठरू शकतो. टीम मॅनेजमेंट यावर तोडगा काही वेगळा विचार करणार का? कॅप्टन स्वत: या निर्णायत सहभागी असणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Team India's captain Rohit Sharma Arrived In Perth a few days after celebrating the arrival of his second child with wife Ritika Sajdeh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.