राजकोट : विदेशात मालिका गमविल्याचे दु:ख विसरून मायदेशात विजयी पथावर पोहोचण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या भारताला अनुभवहीन वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यात विजयाची मोठी संधी आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कठीण दौºयाआधी संघात ताळमेळ साधण्यासाठी या मालिकेचा उपयोग होऊ शकतो.
भारताने गेल्या नऊ महिन्यात द. आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभव पत्करला तरीही संघ अव्वल स्थानावर कायम आहे. विंडीजवर मोठ्या विजयासह मनोबल उंचावणार असून आॅस्ट्रेलिया दौºयाआधी उत्साह संचारेल. आठव्या स्थानावरील विंडीजवर विजय मिळविला तर भारताला खूप काही मिळणार नसले तरी विजयामुळे बळकटी येईल हे मात्र खरे. इंग्लंड दौऱ्यात वारंवार बदलामुळे बरीच टीका झाली. मुरली विजय-शिखर धवन यांना स्थान गमवावे लागले. इंग्लंडमध्ये बाकावर बसून राहिलेल्या करुण नायरला देखील बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यानंतर वाद उद्भवला होता. या सामन्यात लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ ही नवी सलामी जोडी दिसणार हे नक्की. गोलंदाजीत आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तीन फिरकीपटू तसेच उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज संघात असतील. जखमी हार्दिक पांड्या ऐवजी जडेजा अष्टपैलू खेळाडू असेल. याशिवाय रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांच्या निवडीकडेही लक्ष असेल. (वृत्तसंस्था)
भारताने घोषित केला १२ जणांचा संघ
लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीसह पहिल्या कसोटीसाठी अंतिम १२ जणांचा संघ भारताने बुधवारी जाहीर केला. प्रत्येक सामन्याआधी संघ जाहीर करण्याची ही सुरुवात असून, यामुळे अंतिम एकादशबद्दल सुरू राहणाºया चर्चेला पूर्णविराम मिळाला. पाच तज्ज्ञ गोलंदाज संघात असल्याने शार्दुल ठाकूर १२ वा खेळाडू राहील.
प्रतिस्पर्धी संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिश, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेज, शेन डोविच, शेनन गॅब्रियल, जहमार हॅमिल्टन, शिमरान हेटमायर, शाय होप, शर्मन लुईस, केमो पॉल, कीरन पॉवेल, जोमेल वॉरिककेन.
पाच खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव
दुसरीकडे कॅरेबियन संघात प्रतिभेची उणीव नसली तरी १५ पैकी केवळ पाच खेळाडूंना भारतात कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. त्यापैकी केमर रोच काही दिवसांसाठी मायदेशी परतला. देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, ककीरण पॉवेल आणि शेरोन गॅब्रियल हे चार जण २०१३ नंतर प्रथमच येथे कसोटी खेळतील. स्टुअर्ट लॉ यांच्या मार्गदर्शनात संघाने दुबईत सराव केल्यानंतर बडोदा येथे दोन दिवस सराव सामनाही खेळला.
सलामी जोडीला पुरेशी संधी
लोकेश राहुल-पृथ्वी शॉ या युवा सलामी जोडीला आत्मविश्वासाने खेळण्याची पुरेशी संधी दिली जाईल. युवा खेळाडूंनी हे आव्हान नाही तर संधी आहे, असे समजावे. मधल्या आणि तळाच्या स्थानावर बदलाची काहीही
गरज नाही. सलामी जोडीचा प्रश्न निकाली काढण्याखेरीज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात आणखी काही बदल करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही.
- विराट कोहली, कर्णधार.
Web Title: Team India's chance to return to winning position, from today onwards in the first match against the West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.