Team India's fixtures till World Cup 2023: भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आता सज्ज झाला आहे. आयसीसीने मंगळवारी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात १० वेगवेगळ्या शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. तत्पूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज, आयर्लंड, श्रीलंका या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे...
भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी-२० मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या तयारीचा भाग असल्याने त्यांना विंडीज दौऱ्यावर संधी दिली गेली आहे. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ थेट आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे ३ ट्वेंटी-२० संघांची मालिका होणार आहे. या मालिकेत वन डे संघातील सदस्यांना विश्रांती दिली जाईल.
IND vs WI Schedule
कसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) वन डे मालिकापहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)
ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)
भारताच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रकपहिली ट्वेंटी-२० - १८ ऑगस्ट ( दुपारी ३ वाजल्यापासून ) दुसरी ट्वेंटी-२० - २० ऑगस्ट ( दुपारी ३ वाजल्यापासून ) तिसरी ट्वेंटी-२० - २३ ऑगस्ट ( दुपारी ३ वाजल्यापासून )
हा दौरा आटपून भारतीय संघ आशिया चषक २०२३ साठी श्रीलंकेत जाईल. यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आशिया चषक दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.
त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ मैदानावर उतरेल.
वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचं वेळापत्रक
८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला२९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ२ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू