Join us  

MS Dhoni Birthday : माहीच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन! पत्नी साक्षी धोनीच्या एका कृतीनं जिंकली मनं, Video

MS Dhoni Birthday Photos : महेंद्रसिंग धोनी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 3:50 PM

Open in App

MS Dhoni Birthday : कॅप्टन कूल, माही, दिग्गज अशा विविध नावांनी ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी... आजही धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. चाहत्यांचा लाडका माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आयपीएलच्या माध्यमातून आजही चाहत्यांना हेलिकॉप्टर शॉटचा नजारा दाखवतो. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची ओळख आहे. त्याच्या खास रणनीतीने प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात करणारा कॅप्टन कूल आणि सगळ्यांचा लाडका महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रचंड मेहनत आणि मैदानावरील खेळीने त्याने क्रिकेटविश्वात त्याचे नाव धसधशीत उमटवले आहे. केवळ मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीनेच नाही तर धोनी त्याच्या कृतीने प्रेक्षकांची मने जिंकतो. धोनी आज त्याचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. मात्र, त्याची पत्नी साक्षी धोनी चाहत्यांना त्यांच्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते. आता साक्षीने धोनीच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्याची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्टन कूलच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलक दाखवली. व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान देखील पाहायला मिळतो. साक्षी आपल्या पतीच्या पाया पडताना दिसत आहे, तिची ही कृती चाहत्यांना भुरळ घालणारी आहे. 

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डसोशल व्हायरल