आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIनं बुधावारी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण केलं. त्यामुळे टीम इंडियाची रेट्रो जर्सी पुन्हा रिटायर्ड झाली आहे. १७ ऑक्टोबरपासून यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज केएल राहुल यांनी नवी जर्सी परिधान केल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. भारताची ही जर्सी नेव्ही ब्लू रंगाचीच आहे आणि जर्सीच्या पुढच्या भागावर लाईट निळ्या रंगांच्या रेषा आहेत. इंडिया व खेळाडूंची नावं भगव्या रंगानं लिहिली गेली आहेत आणि डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. पण, त्या लोगोवर तीन स्टार का आहेत, यामागचं उत्तर शोधूयात..