टीम इंडियाची ‘हजारी’ वाटचाल; जाणून घ्या, एक हजार सामन्यांतील भारतीय संघाचे महत्त्वाचे टप्पे

भारताने आतापर्यंत ९९९ सामने खेळले असून, त्यातील ५१८ जिंकले, तर ४३१ गमावले.  नऊ सामने ‘टाय’ झाले, तर ४१ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 01:36 PM2022-02-06T13:36:53+5:302022-02-06T13:41:05+5:30

whatsapp join usJoin us
Team India's journey; Know the important milestones of the Indian team in a thousand matches | टीम इंडियाची ‘हजारी’ वाटचाल; जाणून घ्या, एक हजार सामन्यांतील भारतीय संघाचे महत्त्वाचे टप्पे

संग्रहित छायाचित्र.

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : यजमान भारतीय संघ हजाराव्या सामन्याद्वारे विंडीजविरुद्ध वन डे मालिकेला सुरुवात करणार आहे. भारताने आतापर्यंत ९९९ सामने खेळले असून, त्यातील ५१८ जिंकले, तर ४३१ गमावले.  नऊ सामने ‘टाय’ झाले, तर ४१ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. एक हजार सामन्यातील भारतीय संघाचे महत्त्वपूर्ण टप्पे असे...

- सर्वोच्च धावा :- ८ डिसेंबर २०१८ वि. वेस्ट इंडिज, इंदूर ५० षटकांत ५ बाद ४१८
- निचांक :-  २९ ऑक्टोबर २००० वि. श्रीलंका, शारजा २६.३ षटकांत सर्वबाद ५४
- सर्वात मोठा विजय : १९ मार्च २००७, पोर्ट ऑफ स्पेन,  वि. बर्मुडा २५७ धावांनी
- वैयक्तिक कामगिरी : सर्वाधिक सामने सचिन तेंडुलकर ४६३, सर्वाधिक धावा : सचिन तेंडुलकर १८,४२६,
- सर्वोच्च खेळी : रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका १३ नोव्हेंबर २०१४ कोलकाता
- सर्वाधिक शतके : सचिन तेंडुलकर : ४९, सर्वाधिक अर्धशतके: सचिन तेंडुलकर : ९६ 
- सर्वाधिक वेळा भोपळा : सचिन तेंडुलकर २० वेळा.
- मालिकेत सर्वाधिक धावा : सचिन तेंडुलकर ६७३, २००३ विश्वचषक, द. आफ्रिका
- सर्वोच्च स्ट्राईक रेट : जहीर खान २९०.० वि. झिम्बाब्वे, ८ डिसेंबर २०००, जोधपूर
- सर्वाधिक बळी : अनिल कुंबळे ३३४, उत्कृष्ट गोलंदाजी : स्टुअर्ट बिन्नी ४/६,वि. बांगला देश १७ जून २०१४, मीरपूर.
- मालिकेत सर्वाधिक बळी : जहीर खान, २१, विश्वचषक २०११, भारत
- सर्वाधिक धावा मोजल्या : भुवनेश्वर कुमार १/१०६ वि. द. आफ्रिका २५ ऑक्टोबर २०१५ मुंबई
- यष्टिरक्षकाची सर्वोत्तम कामगिरी : महेंद्रसिंह धोनी, ४३८ (३१८ झेल, १२० स्टम्पिंग)
- यष्टिरक्षकाचे सामन्यात योगदान : महेंद्रसिंह धोनी ६ (५ झेल, एक स्टम्पिंग) वि. इंग्लंड २ सप्टेंबर २००७ लीड्स
- मालिकेत योगदान : महेंद्रसिंह धोनी २१(१९ झेल, २ स्टम्पिंग) २००७-०८ ऑस्ट्रेलिया 
- सर्वाधिक झेल : मोहम्मद अझहरुद्दिन १५६ झेल
- मालिकेत सर्वाधिक झेल : व्हीव्हीएस लक्ष्मण : १२, व्हीबी मालिका २००३-०४

सर्वाधिक भागीदारी  
- पहिली विकेट -२५८,  सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली वि. केनिया २४ ऑक्टोबर २००१ पार्ल 
- दुसरी विकेट -३३१ - सचिन तेंडुलकर - राहुल द्रविड - वि. न्यूझीलंड ८ नोव्हेंबर हैदराबाद 
- तिसरी विकेट-२३७ (नाबाद) राहुल द्रविड- सचिन तेंडुलकर वि. केनिया, २३ मे १९९९ ब्रिस्टल 
- चाैथी विकेट - २७५ नाबाद अझहरुद्दीन- अजय जडेजा वि. झिम्बाब्वे ९ एप्रिल १९९८ कटक 
- पाचवी विकेट - २२३ अझहरुद्दिन- अजय जडेजा वि. श्रीलंका १७ ऑगस्ट १९९७ कोलंबो 
- सहावी विकेट - १६० अंबाती रायुडू- स्टुअर्ट बिन्नी वि. झिम्बाब्वे १० जुलै २०१५ हरारे 
- सातवी विकेट - १२५ नाबाद धोनी- अश्विन वि. पाकिस्तान ३० डिसेंबर २०१२ चेन्नई 
- आठवी विकेट - १०० नाबाद धोनी- भुवनेश्वर वि. श्रीलंका २४ ऑगस्ट २०१७ पल्लेकल 
- नववी विकेट - १२६ नाबाद कपिल देव- सय्यद किरमानी वि. झिम्बाब्वे १८ जून १९८३ 
- दहावी विकेट - ६४ हरभजन- लक्ष्मीपती बालाजी वि. इंग्लंड ३ सप्टेंबर ओव्हल
५० हून अधिक सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार
- कपिल देव (१९८२-८७): ७४ सामने (३९ विजय, ३३ पराभव, २ अनिर्णित)
- मोहम्मद अझहरुद्दीन (१९९०-९९) : १७४ सामने (९० विजय, ७६ पराभव, २ टाय,६ अनिर्णित )
- सचिन तेंडुलकर (१९९६-२०००): ७३ सामने - २३ जिंकले,४३ पराभव, १ टाय, ६ अनिर्णित
- सौरव गांगुली (१९९९-२००५): १४६ सामने–७६ विजय, ६५ पराभव, ५ अनिर्णित
- राहुल द्रविड (२०००-२००७):  ७९ सामने ४२ विजय, ३३ पराभव, ४ ड्राॅ
- महेंद्रसिंह धोनी (२००७-२०१८): २०० सामने- ११० विजय, ७४ पराभव, ५ टाय, ११ अनिर्णित
- विराट कोहली (२०१३-२०२१) ९५ सामने – ६५ विजय, २७ पराभव, १ टाय, २ अनिर्णित
 

Web Title: Team India's journey; Know the important milestones of the Indian team in a thousand matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.