ICC ODI World Cup schedule announce: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आयसीसीने आज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. भारताला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा ( चेन्नई) सामना करायचा आहे. त्यानंतर अफगाणिस्तान ( ११ ऑक्टोबर, दिल्ली) अशी मॅच होणार आहे. आता या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते खेळाडू खेळतील यासाठी चढाओढ सुरू होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीने २९ ऑगस्ट ही शेवटची तारीख ठरवली आहे.
टीम इंडिया ९ वेगवेगळ्या शहरांत खेळणार; जाणून घ्या कधी, कुठे व कुणाशी भिडणार
भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी १२ वन डे सामने खेळणार आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका होणार आहे. या सामन्यांत बीसीसीआय काही युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या तयारीची चाचपणी करणार आहेत. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये दाखल झाले आहेत आणि ते वर्ल्ड कप स्पर्धेआधी तंदुरूस्त होतील असा अंदाज आहे. बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह पण पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. अशात भारताच्या संभाव्य १५ खेळाडूंमध्ये कोण असेल हे पाहूयात...
भारतीय संघाचं वेळापत्रक
- ८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
- ११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
- १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
- १९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
- २२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
- २९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
- २ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई
- ५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
- ११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, इशान किशन/संजू सॅमसन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन/कुलदीप यादव, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांचा समावेश त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे. त्यांच्यापैकी एकाच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते.