T20 WC साठीच्या टीम इंडियाच्या संभाव्य २० खेळाडूंची नावे आली समोर; Hardik Pandya चे... 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेचच होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:43 PM2024-04-17T18:43:40+5:302024-04-17T18:44:14+5:30

whatsapp join usJoin us
Team India's probable 20 (15 squads + 5 stand bys) for the T20 World Cup 2024, Virat, Hardik in team Rishabh Pant comback | T20 WC साठीच्या टीम इंडियाच्या संभाव्य २० खेळाडूंची नावे आली समोर; Hardik Pandya चे... 

T20 WC साठीच्या टीम इंडियाच्या संभाव्य २० खेळाडूंची नावे आली समोर; Hardik Pandya चे... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India's probable 20 for the T20 World Cup 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेचच होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विराट कोहलीला संधी मिळणार की नाही? हार्दिक पांड्याचे काय? रिषभ पंत पुनरागमन करेल की नाही? हे ना असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या डोक्यात वादळ आणत आहेत. अजित आगरकर जेव्हापासून निवड समितीचा अध्यक्ष झाला, तेव्हापासून टीम इंडियामध्ये काही धाडसी निर्णय घेतले गेले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली गेली आणि हे निर्णय योग्य ठरले. असाच प्रयोग ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडताना होईल का, हे पाहायचे आहे.


१ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे.  या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत  आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. या स्पर्धेसाठी रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल हे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच जाहीर केले होते. विराट कोहलीबाबत मात्र अद्याप मौन पाळले जात होते. पण, आयपीएल २०२४ मधील त्याचा फॉर्म पाहता त्याला नजरंदाज करणे अवघड होऊन बसले आहे.


गटवारी 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

स्पर्धेचा फॉरमॅट...
- २० संघ
- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी 
- चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र
- सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी 
- दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत
- फायनल

भारतीय संघाचे वेळापत्रक

५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

PTI ने जाहीर केलेल्या संभाव्या २० खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आहेतच. शिवाय हार्दिक पांड्या व रिंकू सिंगही संघात आहेत. रिषभ पंतचे पुनरागमन होत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, संघ निवडताना कोणताच प्रयोग केला जाणार नाही. जे भारतासाठी खेळले आहेत आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व आयपीएलमध्ये सातत्याने कामगिरी करत आहेत, त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात संधी दिली जाईल. 

संभाव्य २० खेळाडू - रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग व आवेश खान. ( Rohit Sharma, Virat Kohli, Yashasvi, Gill, Surya, Rinku, Hardik, Pant, KL Rahul, Samson, Jadeja, Dube, Axar, Kuldeep, Yuzi, Bishnoi, Bumrah, Siraj, Arshdeep & Avesh.) 

 

Web Title: Team India's probable 20 (15 squads + 5 stand bys) for the T20 World Cup 2024, Virat, Hardik in team Rishabh Pant comback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.