Join us

टीम इंडियाचा 'गब्बर' मिस्ट्री गर्लच्या प्रेमात? शिखर धवनचा व्हिडीओ व्हायरल!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:22 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेला क्रिकेटपटू शिखर धवन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो एका नवीन मुलीबरोबर दिसतो. शिखर धवन मिस्ट्री गर्लबरोबर मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. धवनबरोबर दिसणारी ही नवी मिस्ट्री गर्ल कोण? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

धवनची व्हिडीओ व्हायरलधवन घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि तो या मुलीशी लग्न करणार का, असे बरेच प्रश्न चाहत्यांमध्ये सुरु आहेत, त्यामुळे या व्हिडीओमध्ये ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. शिखर धवनबरोबरच ती मिस्ट्री गर्लसुद्धा कारमधून उत्तरली. यानंतर ती कॅमेऱ्याकडे पाठमोरी उभी होती. ती भारतीय नसून विदेशी आहे. विमानतळाबाहेर पडेपर्यंत धवनपासून ती खूप लांब, मागे उभी होती. दोघांचा एकत्र फोटो क्लिक करू नये, असा त्यामागे हेतू असावा.

अलीकडेच गब्बरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले. पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.

टॅग्स :शिखर धवनऑफ द फिल्ड