Team India squad for ICC Under-19 Women’s T20 World Cup 2025 : नव्या वर्षात मलेशियात रंगणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली. १८ जानेवारी ते २ फ्रेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. आशिया कप स्पर्धेत खेळणाऱ्या संघात एक बदल करून बीसीसीआयने अंडर १९ महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केलीये. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील एका खेळाडूशिवाय अन्य दोघींना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे.
भारतीय संघाला आशियाई चॅम्पियन करणाऱ्या छोरीलाच मिळाली कॅप्टन्सी
अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप २०२५ च्या स्पर्धेत निकी प्रसाद भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय सानिका चाळके हिच्याकडे उप कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आलीये. नुकत्याच झालेल्या पहिल्या वहिल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघानं बाजी मारली होती. या संघातील बहुतांश खेळाडूंना वर्ल्ड कपचं तिकीट मिळाले आहे. भारतीय संघात दोन विकेटकिपरच्या रुपात कमलिनी जी आणि भाविका अहिरे यांचा समावेश करण्यात आलाय.
आशिया कप स्पर्धेतील संघात फक्त एकमेवर बदल
अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघानं फायनलमध्ये बांगलादेशच्या संघाला मात देत आशियाई चॅम्पियनचा मान मिळवला होता. या संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. नंदना एस हिच्या जागी वैष्णवी एसला टी-२० वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे नंदना हिला राखीव खेळाडूच्या यादीत ठेवण्यात आले आहे.
ICC Under-19 Women’s T20 World Cup 2025 साठी भारतीय संघ
निकी प्रसाद (कॅप्टन), सानिका चाळके (उपकॅप्टन), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.
राखीव खेळाडू: नंदना एस, इरा जे, अनादी टी.
Web Title: Team India’s squad for ICC Under 19 Women’s T20 World Cup 2025 Announced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.