युएईमध्ये सध्या इंडियन प्रीमिअर लीग सुरु आहे आणि त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) रवाना होणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून यामध्ये तीन टी- २०, तीन वन-डे आणि चार कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासाठीचा क्वारंटाइन कालावधी निश्चीत केला असून सिडनीत दोन्ही देशांमधील मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात सिडनी आणि कॅनबेरामधून करेल. या दौऱ्यातल्या पहिल्या दोन वनडे 27 आणि 29 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये होतील, तर तिसरी वनडे आणि पहिला टी-20 सामना कॅनबेरामध्ये होईल, यानंतर सीरिजच्या शेवटच्या दोन टी-20 पुन्हा सिडनीमध्ये खेळवल्या जाणार आहे.
भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक-
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनीदुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनीतिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हलदुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनीतिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेडदुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेडतिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनीचौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे या कार्यक्रमात बदल करण्यात आला. जेव्हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२० रद्द करण्यात आला तेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मर्यादित षटकांच्या सीरीजचे आयोजन करण्यात आले होते.