Join us  

दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'

Dinesh Karthik News : दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 7:36 PM

Open in App

Dinesh Karthik Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी या अनुभवी खेळाडूने क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. एक भावनिक पोस्ट करत डिकेने ही घोषणा केली. खरे तर तो आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या आधी आयपीएलला रामराम करणाऱ्या कार्तिकने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील रामराम केले. 

भारतासाठी १८० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कार्तिकने ३४६३ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने यष्टीरक्षक म्हणून १७२ फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो हिस्सा राहिला आहे. २००७ मध्ये कार्तिक भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. १५ वर्षांच्या कारकिर्दीत दिनेश कार्तिकच्या वाटेत अनेक चढ-उतार आले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १०२५ धावा केल्या आहेत. याशिवाय ९४ वन डे सामन्यांमध्ये त्याने १७५२ धावा केल्या. तसेच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कार्तिकने ६० सामन्यांत ६८६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट वगळता एकदाही कार्तिकला शतकी खेळता आली नाही. 

दरम्यान, जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात एक अतिरिक्त खेळाडू दिसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम नसला तरी दिनेश कार्तिक अनेकदा इम्पॅक्ट पाडताना दिसला आहे. अनेक चढ-उतार वाटेत असताना त्याने क्रिकेट विश्वाला धक्का देत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात फिनिशर म्हणून दिसलेला कार्तिक आजतागायत तमाम भारतीयांच्या मनात आहे. आयपीएलमध्ये कारकिर्दीच्या अखेरीस आरसीबीकडून खेळताना कार्तिकने फिनिशर म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर झालेल्या कार्तिकने अनेकदा भारतीय संघात पुनरागमन करण्यात यश मिळवले. 

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकिर्द १७ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिकला केवळ एका हंगामात ५०० हून अधिक धावा करता आल्या. त्याने २०१३ मध्ये मुंबईकडून खेळताना ही किमया साधली होती. पहिल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाल्याने कार्तिकला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळला. दिनेश कार्तिक दिल्ली डेयरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सहा संघाकडून खेळला आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण २५७ सामने खेळले असून, ४८४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २२ अर्धशतके झळकावता आली.  

टॅग्स :दिनेश कार्तिकआंतरराष्ट्रीय क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ