कोलंबो : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गुरुवारी श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ५ बाद ३७५ धावांचा एव्हरेस्ट उभारला. कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने यजमानांची जबरदस्त धुलाई करताना त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. यानंतर भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा डाव ४२.४ षटकांत २०७ धावांमध्ये संपुष्टात आला. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर लंकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला. माजी कर्णधार अॅन्जोलो मॅथ्यूज (७0) शिवाय श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. मिलिंदा सिरिवर्दनाने (३९) त्यातल्या त्यात काहीशी झुंज दिली. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पदार्पण करणाºया शार्दूल ठाकूर व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.तत्पूर्वी, कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला; पण भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन (४) दुसºयाच षटकात माघारी परतला. त्याला विश्व फर्नांडोने (१-७६) बाद केले. धवन बाद झाल्यानंतर कोहलीने ९६ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह १३१ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील २९वे शतक पूर्ण केले.यासह सर्वाधिक शतके झळकावणाºया फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले. त्याने रोहितसह (१०८) दुसºया विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी केली. रोहितने ८८ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व ३ षटकार ठोकले.हे दोघे बाद झाल्यानंतर मनीष पांडे (नाबाद ५० धावा, ४२ चेंडू, चार चौकार) आणि कारकिर्दीतील ३००वा वन-डे खेळणारा महेंद्रसिंह धोनी (नाबाद ४९ धावा, ४२ चेंडू,५ चौकार, १ षटकार) यांनी सहाव्याविकेटसाठी वेगवान शतकी भागीदारी करून अखेरच्या १२.२ षटकांत १०१ धावा वसूल केल्या. श्रीलंकेविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.सर्वाधिक शतक ठोकण्याच्या क्रमवारीत कोहलीपुढे सचिन तेंडुलकर (४९) आणि आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (३०) आहेत. विशेष म्हणजे कोहलीने केवळ १८५ व्या डावात ही कामगिरी केली. तसेच, या वेळी कोहलीने श्रीलंकेविरुद्ध दोन हजार धावांचा पल्लाही गाठला. त्याने ४४ डावांमध्ये ही कामगिरी केली. दुसरीकडे, शतकवीर कोहलीला बाद करुन मलिंगाने आपल्या बळींचे त्रिशतक पूर्ण केले. दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर (५३४) अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा दुसरा, तर जगातील एकूण १३ वा गोलंदाज ठरला. मॅथ्यूज टाकत असलेल्या ३५व्या षटकातील दुसºया चेंडूवर हार्दिक पांड्याचा (१९) झेल घेण्यात धनंजय अपयशी ठरला. परंतु, या संधीचा फायदा पांड्याला घेता आला नाही. पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मॅथ्यूजने त्यानंतरच्या चेंडूवर शतकवीर रोहितला बाद केले. मनीष पांडेने मॅथ्यूजला हॅट्ट्रिकपासून रोखले, पण लोकेश राहुल (७) मात्र पुन्हा अपयशी ठरला. धनंजयने त्याला बाद केले त्या वेळी भारताची ५ बाद २७४ अशी स्थिती होती. यानंतर पांडे व धोनी यांनी तुफानी शतकी भागीदारी करीत भारताला दमदार मजल मारून दिली.धावफलकभारत : रोहित शर्मा झे. डिकवेला गो. मॅथ्यूज १०४, शिखर धवन झे. पुष्पकुमार गो. फर्नांडो ०४, विराट कोहली झे. मुनावीरा गो. मलिंगा १३१, हार्दिक पांड्या झे. डिसिल्वा गो. मॅथ्यूज १९, लोकेश राहुल झे. डिसिल्वा गो. धनंजय ०७, मनीष पांडे नाबाद ५०, महेंद्रसिंह धोनी नाबाद ४९. अवांतर -११. एकूण : ५० षटकांत ५ बाद ३७५.गोलंदाजी : मलिंगा १०-०-८२-१, फर्नांडो ८-१-७६-१, मॅथ्यूज ६-२-२४-२, पुष्पकुमार ९-०-६५-०, धनंजय १०-०-६८-१, डिसिल्वा २-०-१९-०, श्रीवर्धने ५-०-३६-०.श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. धोनी गो. शार्दुल ३६, दिलशान मुनावीरा झे. धोनी गो. बुमराह ११, कुशल मेंडिस धावबाद (राहुल) १, लाहिरु थिरिमाने झे. धवन गो. हार्दिक १८, अॅन्जेलो मॅथ्यूज झे. शार्दुल गो. अक्षर ७०, मिलिंदा सिरिवर्दना झे. धोनी गो. हार्दिक ३९, वनिंदू हसारंगा धावबाद (बुमराह - अक्षर) ०, मलिंदा पुष्पकुमारा झे. हार्दिक गो. बुमराह ३, विश्वा फर्नांडो झे. व गो. कुलदीप ५, लसिथ मलिंगा त्रि. गो. कुलदीप ०. अवांतर - १३. एकूण : ४२.४ षटकात सर्वबाद २०७ धावा.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ७-०-२६-१; जसप्रीत बुमराह ७-०-३२-२; हार्दिक पांड्या ८-०-५०-२; विराट कोहली २-०-१२-०; कुलदीप यादव ८.४-१-३१-२; अक्षर पटेल १०-०-५५-१. रोहितने संयमी तर कोहलीने आक्रमक फलंदाजी करीत धावफलक हलता ठेवण्याची भूमिका चोख बजवाली. कोहलीने फर्नांडोच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार ठोकत खाते उघडले. रोहितने मॅथ्यूजला षटकार ठोकत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक झळकावले. यानंतर त्याने अकिला धनंजयला सलग चौकारव षटकार ठोकत १४ व्या षटकात संघाचे शतकपूर्ण केले.२९वे शतक ठोकूनकोहली तिसºया स्थानीकर्णधार विराट कोहलीने कोलंबोत श्रीलंकेविरु द्ध चौथ्या वन-डेत २९वे वेगवान शतक ठोकले. त्याने ७६ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह शतक गाठले. यासोबतच वन-डेत सर्वाधिक शतके ठोकणाºया खेळाडूंमध्ये तो तिसºया स्थानी आला. कोहली यंदा सर्वांत वेगवान शतक गाठणारा खेळाडूदेखील ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला (२८ शतके) मागे टाकले. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह अव्वल स्थानी, तर आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ३० शतकांसह दुसºया स्थानावर आहे.धोनी ३००च्याक्लबमध्येमाजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज ३०० वा वन-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील २०वा खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. धोनीने भारताकडून २९७ तसेच तीन सामने आशिया एकादशकडून खेळले आहेत. आज त्याने नाबाद ४९ धावा केल्या. वन-डेत शंभर अर्धशतकांची नोंद करण्याची त्याला आजच संधी होती, पण एका धावेमुळे ही संधी हुकली. ४६३ वन-डे खेळलेल्या सचिनने ३००वेळा वन-डे कॅप घालणे ही अप्रतिम कामगिरी आहे, या शब्दांत धोनीचे कौतुक केले.तू नेहमी आमचाकर्णधार असशील : कोहलीधोनीच्या विशेष उपलब्धीबद्दल कोहलीने संघाच्या वतीने त्याला स्मृतिचिन्ह भेट दिले. तुला स्मृतिचिन्ह देणे माझ्यासाठी गौरवास्पद असून, तू नेहमी आमचा कर्णधार असशील, असे विराट म्हणाला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टीम इंडियाचा विजयी चौकार : श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा, कोहली, रोहितची शतकी खेळी
टीम इंडियाचा विजयी चौकार : श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा, कोहली, रोहितची शतकी खेळी
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गुरुवारी श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 4:04 AM