सिडनी : टीम इंडिया आॅस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारपासून सुरू होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे. या मालिकेद्वारे आगामी विश्वचषकाच्या तयारीचा श्रीगणेशा करण्याचा देखील संघाचा प्रयत्न आहे. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी एका टीव्ही शोमध्ये महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना या मालिकेत खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहित व धवन या यशस्वी सलामी जोडीची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे अष्टपैलू पांड्याच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीत बदल होईल. अशावेळी भुवनेश्वरचे खेळणे जवळपास नक्की असेल. याशिवाय मोहम्मद शमी व खलील अहमद यांच्यापैकी एकाला संधी असेल. एससीजीच्या खेळपट्टीवर थोडे गवत असल्याने तीन वेगवान व दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची कोहलीची योजना असेल. प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंदसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.आॅस्ट्रेलिया (अंतिम ११ खेळाडू) : अॅरोन फिंच (कर्णधार), अॅलेक्स केरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कोम्ब, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लियोन, पीटर सिडल,ृ झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडोर्फ.खराब रेकॉर्डआॅस्ट्रेलियात भारताचा रेकॉर्ड फारच खराब आहे. १९८५ ची विश्व चॅम्पियनशिप सिरिज तसेच २००८ च्या सीबी सिरिजमधील विजयाचा अपवाद वगळता भारताने येथे ४८ पैकी ३५ एकदिवसीय सामने गामवले. यंदा मात्र स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीचा भारताला लाभ होऊ शकतो. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड यांनाही आॅस्टेÑलियाने विश्रांती दिली आहे. आॅस्ट्रेलियाने आपल्या एकदिवसीय संघाची घोषणा आधीच केली असून त्यात नॅथन लियोन या एकमेव फिरकी गोलंदाजाचा समावेश आहे. यष्टिरक्षक- फलंदाज अॅलेक्स कॅरी हा कर्णधार अॅरोन फिंचसोबत सलामीला खेळणार आहे. मधल्या फळीत उस्मान ख्वाजा, शॉॅन मार्श आणि पीटर हँडस्कोम्ब हे धावसंख्येला आकार देण्यास सक्षम आहेत. त्याचवेळी, वेगवान गोलंदाज पीटर सिडल आठ वर्षानंतर संघात परतला आहे.