संपूर्ण जगाचे २०२० हे वर्ष कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यातच गेले... आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. २०२१मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी मेजवानीच आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, टीम इंडियाचे दौरे आणि घरच्या स्टेडियमवर तगड्या संघांसोबतचे सामने... यासाठी खेळाडूच नव्हे तर चाहतेही सज्ज झाले आहेत. पण, २०२१मध्ये टीम इंडियाच्या ७ युवा शिलेदारांवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या. डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
प्रियम गर्ग ( Priyam Garg) - भारताच्या १९ वर्षांखालील संघानं दिलेला आणखी एक स्टार खेळाडू. आयपीएल २०२०त त्यानं सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलं. १९ वर्षांखालील टीम इंडियाचा तो कर्णधार होता आणि त्यानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. तो ११ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले.
रवि बिश्नोई ( Ravi Bishnoi) - भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा तो सदस्य आहे. त्यानं आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केलं आणि १४ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं १७ विकेट्स घेतल्या होत्या.
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) - या खेळाडूला भारतीय संघात स्थान का दिले जात नाही, हा प्रश्न अनेकदा अनेकांनी विचारला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही.