Legends League Cricket 2024 : जागतिक क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू लीजेंड्स लीग क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात असणार आहेत. आजपासून या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यंदा अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन दिसणार आहे. याशिवाय दिनेश कार्तिक देखील लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसेल. जोधपूर येथून या स्पर्धेला सुरुवात होईल, इथे सुरुवातीचे सहा सामने खेळवले जातील. तसेच २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सूरत येथे सामने होतील, तर ३ ऑक्टोबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत जम्मूत सामन्यांचा थरार रंगेल. अखेरचे काही सामने ९ ऑक्टोबरपासून श्रीनगर येथे होतील. तर, चेन्नई येथे १६ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात असतील.
लीजेंड्स लीग क्रिकेटचे लाईव्ह सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. याशिवाय फॅनकोड ॲपवर चाहत्यांना ही स्पर्धा पाहता येईल. लीजेंड्स लीग क्रिकेट २०२४ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर काही सामने ३ वाजता देखील खेळवले जातील.
स्पर्धेसाठी सर्व सहा संघ -
इंडिया कॅपिटल्स - इयान बेल (कर्णधार), ड्वेन स्मिथ, ॲशले नर्स, धवल कुलकर्णी, ध्रुव रावल, बरिंदर सरन, रवी बोपारा, परविंदर अवाना, नमन ओझा, ख्रिस मपोफू, इकबाल अब्दुल्ला, किर्क ॲडवार्क्स, पंकज सिंह, पवन सुयाल, राहुल शर्मा, ज्ञानेश्वर राव, फैज फझल, कॉलिन डी ग्रँडहोम, भरत चिपली, बेन डंक.
गुजरात जायंट्स - शिखर धवन (कर्णधार), ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मॉर्ने वान विक, लिंडल सिमंस, असोहर अफोहान, जेरोम टेलर, पारस खाडा, सीकुगे प्रसन्ना, कमाउ लेवररॉक, सायब्रांड एनोएलब्रेक्ट, शॅनन गेब्रियल, समर क्वाड्री, मोहम्मद कैफ, एस श्रीसंत.
कोणार्क सूर्या ओडिशा - इरफान पठाण (कर्णधार), युसूफ पठाण, केविन ओ ब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज नदीम, फिदेल एडवर्ड्स, बेन लॉफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानिया, केपी अपन्ना, अंबाती रायुडू, नवीन स्टीवर्ट.
मणिपाल टायगर्स - हरभजन सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉटरेल, डॅन ख्रिश्चियन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असेला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इमरान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग, प्रवीण गुप्ता, सौरभ तिवारी.
सदर्न सुपरस्टार्स - दिनेश कार्तिक (कर्णधार), एल्टन चिगुंबुरा, हॅमिल्टन मसाकाद्जा, पवन नेगी, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, श्रीवत्स गौस्वामी, हामिद हसन, नाथन कूल्टर नाइल, चिराग गांधी, सुबोथ भाटी, रॉबिन बिस्ट, जेसल कारी, चतुरंगा डी सिल्वा, मोनू कुमार.
अर्बनरायजर्स तोयम हैदराबाद - सुरेश रैना (कर्णधार), गुरकीरत सिंग, पीटर ट्रेगो, समीउल्लाह शिनवारी, जॉर्ज वर्कर, इसुरू उदाना, रिक्की क्लार्क, स्टुअर्ट बिन्नी, जसकरन मल्होत्रा, चॅडविक वाल्टन, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप, योगेश नागर.
Web Title: team of Shikhar Dhawan, Suresh Raina, Harbhajan Singh, Dinesh Karthik, Irfan Pathan and Ian Bell will play in legends league cricket 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.