मोठी बातमी : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारला

Team Pakistan's visa for Blind T20 World Cup rejected - भारतात होणाऱ्या दृष्टिहीनांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला सहभाग घेता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:02 PM2022-12-06T19:02:52+5:302022-12-06T19:13:08+5:30

whatsapp join usJoin us
Team Pakistan's visa to travel to India and take part in Blind T20 World Cup has been rejected, confirmed GK Mahantesh, the President of Cricket Association for the Blind in India (CABI) | मोठी बातमी : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारला

मोठी बातमी : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team Pakistan's visa for Blind T20 World Cup rejected - भारतात होणाऱ्या दृष्टिहीनांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला सहभाग घेता येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिसा नाकारण्यात आल्याची माहिती भारतीय दृष्टिहीनांच्या क्रिकेट असोसिएशनचे ( CABI) अध्यक्ष जी के महांतेश यांनी दिली. “दुर्दैवाने पाकिस्तान दृष्टिहीनांचा क्रिकेट संघ अडचणीत आला आहे. पाकिस्तान वर्ल्ड कप विजायाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक होता. ते २०१२ व २०१७ मध्ये उपविजेते होते. २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत त्यांनी भारतावर सलग पाच विजय मिळवले होते आणि दोन्ही मालिका जिंकल्या होत्या,” असे पाकिस्तान दृष्टिहीनांच्या  क्रिकेट परिषदेने (PBCC) एका निवेदनात म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत होण्याची दाट शक्यता होती आणि सध्याचा संघाचा फॉर्म पाहता पाकिस्तानचे वर्ल्ड कप विजयाची संधी अधिक होती. उपलब्ध माहितीनुसार भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने राजकीय घडामोडींमुळे पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला मंजुरी नाकारली आहे. PBCC ने भारताच्या या भेदभाव करणार्‍या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. कारण खेळ हे प्रादेशिक राजकारणापेक्षा वेगळा ठेवायला  पाहिजे आणि विशेषत: दिव्यांग खेळाडूंना न्याय्यपणे वागवले जाईल आणि सर्व संघांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी समान संधी दिली पाहिजे. भारतातीय दृष्टिहीनांच्या क्रिकेट असोसिएशनने सरकारला पाकिस्तानला व्हिसा मिळावा यासाठी विनंती केली परंतु काही उपयोग झाला नाही.”

दृष्टिहीनांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे. पाकिस्तानला माघार घ्यावी लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारत या संघांमध्ये ९ शहरांमध्ये २४ सामने खेळवले जातील.  ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत खेळवले जातील. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग हा या स्पर्धेचा ब्रँड अम्बॅसॅडर आहे. “मला ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून दृष्टिहीनांच्या तिसऱ्या ट्वेंटी-वर्ल्ड कप क्रिकेटचा एक भाग बनून आनंद झाला आहे. मी क्रिकेटची आवड आणि दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या दैनंदिन आव्हानांशी लढण्याच्या निर्धाराची प्रशंसा करतो. हे एक वेगळं जग आहे, पण हे क्रिकेटचे जग आहे आणि क्रिकेटला सीमा नसतात. माझा असा विश्वास आहे की या खेळाने मला कसे लढायचे, कसे पडायचे, पुन्हा कसे उठायचे आणि स्वत: वर कसे यायचे हे शिकवले. म्हणूनच मी सर्वांना विनंती करतो आणि आमंत्रित करतो की पुढाकार घेऊन या महान उपक्रमाला पाठिंबा द्या." असे आवाहन युवराज सिंगने केले होते. 

भारतीय संघ: ललित मीना, प्रवीण कुमार शर्मा, सुजीत मुंडा, नीलेश यादव, सोनू गोलकर, सोवेंदू महाता, अजय कुमार रेड्डी (क), व्यंकटेश्वर राव (वीसी), नकुला बदनायक, इरफान दिवान, लोकेशा, टोमपाकी दुर्गा राव, सुनील रमेश, ए रवी, प्रकाश जयरामय्या, दीपक मलिक, धिनगर जी ( India’s T20 World Cup squad: Lalit Meena, Praveen Kumar Sharma, Sujeet Munda, Nilesh Yadav, Sonu Golkar, Sovendu Mahata, Ajay Kumar Reddy (c), Venkateswara Rao (vc), Nakula Badanayak, Irfan Diwan, Lokesha, Tompaki Durga Rao, Sunil Ramesh, A Ravi, Prakash Jayaramaiah, Deepak Malik, Dhinagar G) 
 
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Team Pakistan's visa to travel to India and take part in Blind T20 World Cup has been rejected, confirmed GK Mahantesh, the President of Cricket Association for the Blind in India (CABI)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.