Teams qualified directly into the T20 World Cup 2024 - भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ग्रुप २ मधील आजच्या अखेरच्या सामन्यात भारताने ७१ धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवताना ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. नेदरलँड्सने ग्रुप २ मधील आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात धक्कादायक विजयाची नोंद केली आणि दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर केले. पाकिस्तानने ४ विकेट्स राखून बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारत- इंग्लंड आणि पाकिस्तान-न्यूझीलंड असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पण, भारताचा हा विजय नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश निश्चित केला.
भारत, पाकिस्तान यांचे उपांत्य फेरीचे प्रतिस्पर्धी ठरले; जाणून घ्या कधी व कुठे होणार हे सामने
नेदरलँड्सने राऊंड १ मध्ये संयुक्त अरब अमिराती ( ३ विकेट्स राखून), नामिबिया ( ५ विकेट्स राखून) यांच्यावर विजय मिळवत Super 12 मधील ग्रुप २ मध्ये स्थान पक्के केले. राऊंड १ मध्ये त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. ग्रुप २ मध्ये त्यांना भारत, बांगलादेश व पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. मात्र, अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी झिम्बाब्वे ( ५ विकेट्स राखून) व दक्षिण आफ्रिका ( १३ धावांनी) यांच्यावर विजय मिळवत ४ गुणांची कमाई केली. दक्षिण आफ्रिकेला त्यांनी ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. नेदरलँड्ससाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे आता समोर आले आहे.
नेदरलँड्सचे खेळाडू पाकिस्तानला विजय मिळवण्याचे आवाहन करतानाचा व्हिडीओ दिसले. त्यांना ग्रुप २ मध्ये चौथ्या क्रमांकावर राहायचे होते आणि त्यासाठी पाकिस्तान व भारत यांचे आज जिंकणे महत्त्वाचे होते. पाकिस्तानचा बांगलादेशने पराभव केला असता तर ते ६ गुणांसह पुढे सरकले असते व नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तान चौथ्या स्थानी राहिला असता. पण, पाकिस्ताने विजय मिळवला. त्यापाठोपाठ भारताने ७१ धावांनी झिम्बाब्वेला हरवून नेदलँड्सच्या २०२४ वर्ल्ड कप स्पर्धेतील थेट प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
२०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. त्यामुळे हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत. त्यात २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघही पुढील स्पर्धेत थेट पात्र ठरले. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांनी २०२४च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी ICC रँकींगनुसार थेट प्रवेश पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Teams qualified directly into the T20 World Cup 2024, India help Netherlands to get direct qualification
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.