Indian team jersey : आशिया चषक २०२३ उंचावल्यानंतर भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे वर्ल्ड कप विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून यजमान भारत पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडतील. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली गेली आणि आज जर्सीचे अनावरण करण्यात आले.
Adidasकडे भारतीय संघाचे टायटल स्पॉन्सर आहे आणि त्यांनी आज जर्सीचे अनावरण केले. या रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्युकमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज दिसत आहेत. तीन का ड्रीम अशी थीम असलेलं हे गाणं आहे. भारताने १९८३ आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि आता तिसऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघ मैदानावर उतरणार आहे.
भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू