टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठलीये. गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते पहिली वहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न उरी बाळगून लॉर्ड्सच्या मैदानात उतरतील. ११ जूनला क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणारी लढत टेम्बा बवुमासाठीही खास ठरेल. एकही कसोटी सामना न गमावता टेस्टमध्ये कॅप्टन्सीतील बेस्ट वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्याची त्याला संधी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटीतील बेस्ट कर्णधारांच्या यादीत अजिंक्यचाही लागतो नंबर
पाकिस्तान विरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात त्याने पाकिस्तानला पराभूत करत वॉरविक आर्मस्ट्राँग या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी केली. संघाला आणखी एक विजय मिळवून देत तो नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना एकही पराभव न पत्करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत भारतीय स्टार अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. इथं एक नजर टाकुयात कसोटी क्रिकेटमध्ये एकही पराभव न स्विकारलेल्या आघाडीच्या ५ कर्णधारांच्या खास विक्रमावर
टेम्बा बवुमाला वर्ल्ड रेकॉर्डची संधी
टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ९ कसोटी सामन्यातील ८ सामने जिंकले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. एकही सामना न गमावता सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत असणाऱ्या ऑस्ट्रेलियन वॉरविक आर्मस्ट्राँग या दिग्गजाची त्याने बरोबरी केलीये. वॉरविक आर्मस्ट्राँग यांनी १९०२ ते १९२० या कालावधीत ऑस्ट्रेलियानं या दिग्गजाच्या नेतृत्वाखाली सलग ८ सामने जिंकले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकली तर टेम्बा बवुमाच्या नावे ९ कसोटी सामन्यातील विजयासह नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होईल.
असे पाच टेस्ट कॅप्टन ज्यांच्या नेतृत्वाखाली संघानं कधीच गमावली नाही मॅच
- वॉरविक आर्मस्ट्राँग (ऑस्ट्रेलिया) - ८ विडय, २ अनिर्णित (१९०२-१९२१)
- टेम्बा बवुमा (दक्षिण अफ्रीका) - ८ विजय, १ अनिर्णित (२०२३-२०२५)
- ब्रायन क्लोज (इंग्लंड) - ६ विजय, १ अनिर्णित (१९४९-१९७६)
- चार्ल्स फ्राय (इंग्लंड) - ४ विजय, २ अनिर्णित (१८९६-१९१२)
- अजिंक्य रहाणे (भारत) - ४ विजय, २ अनिर्णित (२०१७-२०२१)