Join us  

१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:30 PM

Open in App

T20 World Cup 2024 : २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी स्पर्धेसाठी सर्व २० संघांनी आपापल्या संघाची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. अशातच माजी खेळाडू आगामी स्पर्धेबद्दल भविष्यवाणी करत आहेत. 'स्टार स्पोर्ट्स'च्या दहा विश्लेषकांनी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या ४ संघांची नावे सांगितली. खरे तर सर्व विश्लेषकांनी भारतीय संघावर विश्वास दाखवत टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार असे संबोधले आहे.

अंबाती रायुडू  (माजी खेळाडू, भारत)भारतइंग्लंड न्यूझीलंडदक्षिण आफ्रिका

ब्रायन लारा (माजी खेळाडू, वेस्ट इंडिज)भारत इंग्लंड वेस्ट इंडिज अफगाणिस्तान 

पॉल कॉलिंगवुड (माजी खेळाडू, इंग्लंड)इंग्लंड वेस्ट इंडिजऑस्ट्रेलियाभारत

सुनिल गावस्कर (माजी खेळाडू, भारत)भारतइंग्लंडऑस्ट्रेलियावेस्ट इंडिज

ख्रिस मॉरिस (माजी खेळाडू, दक्षिण आफ्रिका)भारतदक्षिण आफ्रिकापाकिस्तानऑस्ट्रेलिया

मॅथ्यू हेडन (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)ऑस्ट्रेलिया भारतइंग्लंडदक्षिण आफ्रिका

आरोन फिंच (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)भारतऑस्ट्रेलियाइंग्लंडवेस्ट इंडिज

मोहम्मद कैफ (माजी खेळाडू, भारत)भारतऑस्ट्रेलिया पाकिस्तानइंग्लंड

टॉम मूडी (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)ऑस्ट्रेलियाभारतदक्षिण आफ्रिकाइंग्लंड

एस श्रीसंत (माजी खेळाडू, भारत)भारतपाकिस्तानइंग्लंड ऑस्ट्रेलिया

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटआयसीसीअंबाती रायुडू